। पाली/ वाघोशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पंचशील नगर खवली येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरवादी विचारवंत व सुधागड तालुका बौध्दजन पंचायत ग्रुप नं. 5 चे माजी अध्यक्ष रमाकांत सदाशिव कांबळे (वय 85) यांचे शुक्रवारी (दि.1) निधन झाले.
सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष मोरेश्वर कांबळे गुरुजी यांचे ते वडील होते. त्यांच्या अंत्ययात्रेत सुधागड तालुका तहसीलदार दिलीप रायन्नावर आदींसह सुधागड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रमाकांत कांबळे यांचे पुण्यानुमोदन व श्रद्धांजली सभा रविवारी (दि.10) पंचशील नगर खवली येथे सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.