शेतकरी कामगार पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश
सांगोला | प्रतिनिधी |
आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, संविधानाने तो अधिकार संसदेला दिला आहे. मराठा, ओबीसी किंवा इतरांना आरक्षण द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती करून तशी सुधारणा करण्याची गरज असतांना राज्यातील महाआघाडी आणि भाजप हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली. सांगोला तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज आबासाहेबांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशा प्रसंगी जयंत पाटील बोलत होते.
भाई जयंत पाटील पुढे म्हणाले, मंडल आयोगाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा ही मागणी करणारा शेतकरी कामगार पक्ष हा पहिला पक्ष आहे. व्हि.पी.सिंगांनी त्यावर अंमलबजावणी सुरु केली तर त्यांच्या विरोधात भाजपाने देशात रान उठविले, प्रचंड विरोध केला आणि व्हि.पी.सिंगांचे सरकार गेले.आज तोच भाजप मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलतो हे हात्स्यास्पद असून महाविकास आघाडी आणि भाजपला राज्यातील ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी.मात्र त्यांना असे करुन जनतेला न्याय द्यायचे नाही तर केवळ राजकारण करायचे आहे, त्यामुळे राज्यातील बहुजनांनी सावध व्हावे असे आवाहन भाई जयंत पाटील यांनी केले.
आघाडीच्या जागा वाटपाची बैठक ही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली.शेकापसह डाव्या पक्षांनी मागितलेल्या जागा सोडल्यानंतरही काॅग्रेस – राकाॅने मागाहून उमेदवार दिले आणि शेकापक्षासह डाव्यांना दगा दिला. मात्र कार्यकर्ते हिच शेतकरी कामगार पक्षाची खरी ताकद आहे, हे सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले आहे.
सुरुवातीपासूनच केंद्राने केलेले कायदे संपूर्णपणे रद्द करण्यात यावेत यासाठीच राष्ट्रीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे मागणी करण्यात येत असतांनाही राज्यातील महाविकास आघाडीने विधानसभेत दुरुस्ती विधेयक आणले आहे, ही दुटप्पी भूमिका मान्य नसल्याने आता हा लढा भाजप – काॅग्रेसच्या विरोधात डाव्या आघाडीच्या वतीने यापुढे ताकदीने लढण्यात येईल, असेही भाई जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान बलवडीचे माजी सरपंच शिवसेनेचे नेते विजयदादा शिंदे यांसह शेकापक्षात प्रवेश केलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत करतांना युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला आबासाहेब आजारपणामुळे उपस्थित नाहीत मात्र आबासाहेबांचा वारसा जशाचा तशाच पद्धतीने आमच्याकडून पुढे चालविण्यात येईल.सांगोल्याकडे सरचिटणीसांनी काळजीने बघण्याची वेळ आम्ही येवू देणार नाही,असा विश्वास व्यक्त केला. तसेच शिवसेनेने केलेला विजयदादांवरचा अन्याय शेकापक्षाकडून दूर करण्यात येईल असेही भाई डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला पक्षाचे खजिनदार भाई राहुल पोकळे, कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे, चिटणीस मंडळाचे सदस्य भाई बाबासाहेब कारंडे, श्रीमंत कोकाटे,भाई चंद्रकांत देशमुख, तालुक्यातील शेकापक्षाचे सरपंच,उपसरपंच यांचेसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केलेले शिवसेनेचे नेते,बलवडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच विजय महादेव शिंदे, प्रसाद उर्फ बाळासाहेब नामदेव शिंदे(माजी सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष बलवडी ),अशोक प्रल्हाद खुळपे (वि.से. सोसायटी चेअरमन), दिगंबर धायगुडे (गुरुजी)(माजी डे सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), गणेश मारुती कमले(माजी डे सरपंच ग्रा.पं बलवडी), शंकर करडे (वि.से. सोसायटी व्हा चेअरमन),महेश श्रीरंग शिंदे(वि.से. सोसायटी माजी चेअरमन), सुषमा विजय शिंदे(माजी सरपंच ग्रा.पं बलवडी), सुरेश शिंदे(वि.से. सोसायटी माजी चेअरमन), महादेव गोरख राऊत(ग्रा.पं सदस्य व वि.से. सोसायटी सदस्य), संदीप दत्तात्रय खुळपे (ग्रा.पं सदस्य बलवडी), बापुसाहेब करडे(ग्रा.पं सदस्य बलवडी), सिद्धेश्वर गुरव(ग्रा.पं सदस्य बलवडी), विकास मुरलीधर पवार(वि.से. सोसायटी सदस्य), काकासाहेब शंकर शिंदे(वि.से. सोसायटी सदस्य), शिवाजी पांडुरंग राऊत(माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), दत्तात्रय शंकर इकोर(माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), शिवाजी बाबुराव राऊत(माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), अप्पासाहेब सोपान पवार(माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), तानाजी करडे(माजी ग्रा.पं सदस्य), पांडुरंग करडे(माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), कृष्णदेव कोंडीबा सांगोलकर (माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), दत्तात्रय ईश्वर शिंदे (माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), कुडलिक करडे,माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), शिवाजी गुरव(माजी ग्रा.पं सदस्य बलवडी), समाधान विठ्ठल शिंदे(माजी वि.से. सोसायटी सदस्य बलवडी), विलास नाथा शिंदे (माजी वि.से. सोसायटी सदस्य बलवडी), दिगंबर शिंदेे (माजी वि.से. सोसायटी सदस्य बलवडी) तसेच, सचिन धुकटे, चंद्रकांत सादिगले, दत्तात्रय गणपती राऊत, अप्पासाहेब मोहिते, संतोष शत्रुघ्न खुळपे, नवनाथ दऱ्याप्पा कारंडे, किरण त्रिगुणे, उत्तम महादेव राऊत, संतोष सासणे, दादासाहेब अशोक शिंदे, सुरेश मोहिते, पोपट गायकवाड, दादासाहेब निंबाळकर, विजय ढाबळे, सुभाष यादव, रोहित खुळपे, राजेंद्र खुळपे, राजेंद्र जगन्नाथ करडे, अमर खुळपे, ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत, शहाजी राऊत, विलास सुकदेव शिंदे, हणमंत रघुनाथ शिंदे, सचिन गायकवाड, सुभाष सांगोलकर, गोपीनाथ शिंदे, तात्यासाहेब शिंदे (सर), संतोष धबधबे, राजेंद्र सुतार, पप्पू पवार, सोमनाथ सुतार, बबलू हांडे, विलास सरोदे, महेश चांगदेव शिंदे यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे.