। पनवेल । वार्ताहर ।
आषाढी एकादशीचे औचित्य साधत निसर्गाला तसेच पर्यावर्णालाच विठ्ठल मानून आपण आयोजित केलेल्या वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण हा उपक्रम भरपूर उत्साहात आणि उदंड प्रतिसादाने पार पडला. रोटरीयन्स, ऍनस, अनेटस असे जवळपास 50 जणांनी कर्नाळा अभयारण्यात जाऊन वृक्षदिंडी काढली. विठ्ठल नामाचा जयघोष करीत आणि अभंग म्हणत संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकले . यावेळी डॉ .गिरीश गुणे, डॉ. आमोद दिवेकर, लक्ष्मण पाटील, शिरीष वारंगे, संतोष घोडींदे, डॉ अभय गुरसाळे, शिरीष वारंगे उपस्थित होते. सर्व रोटरीयन्स, ऍनस आणि अनेटस यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी केलेली मदत आणि दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल कर्नाळा वन अधिकार्यांनी सर्वांचे आभार मानले.