| कर्जत | वार्ताहर |
पळसदरी येथील स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. सकाळी अभिषेक, दत्त याग, तसेच दुपारी आरती, महाप्रसाद व मठाचे मठाधिपती स्व. दादा दरेकर यांचे ज्येष्ठ पुत्र विक्रांत दरेकर, नित्यनेमाने सेवा करणार्या वत्सला वांजळे, विजु दरेकर, नितीन चिंदरकर, निलेश सुर्वे, महेश कानिटकर आदी सेवेकर्यांचा तसेच खजिनदार भानू शिंदे, महाप्रसाद बनविणारे आचारी शंकर पवार, सखाराम पवार, मठ परिसर स्वच्छ ठेवणारे स्वच्छतादूत, तसेच कर्मचारी दिलीप पांडे, दादू दरेकर, सदानंद लोखंडे, देवेंद्र तांबे,आदींचा गुरुपौर्णिमा अन्नदान मित्र परिवाराच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, माजी नगरसेविका अरुणा वायकर यांंना शाल, श्रीफळ देण्यात आले. याप्रसंगी अॅड. राजेंद्र निगुडकर, राजू पोतदार, अशोक शितोळे, दिपक कुलकर्णी, सचिन दरेकर, प्रमोद दानवे, मंगेश शिंदे, सुभाष पाटील, तसेच मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते.