| तळा | वार्ताहर |
राधाकृष्ण नामदेव शिंपी समाज संत नामदेव महाराज यांच्या 672 व्या पुण्यतीथीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, दि. 24 जुलै रोजी राधाकृष्ण मंदिर तळा येथे करण्यात आले होते. यावेळी जवळपास 67 रक्त बाटल्या संकलीत करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठ दान समजून देशसेवा करणार्या सैनिक, रुग्ण, अपघातग्रस्तांना जीवदान मिळण्याच्या उदात्त हेतूने रक्तदान केले. संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कजबजे, सालकरी व्यवस्थापक श्रीराम कजबजे, सेक्रेटरी नमित पांढरकामे, नामदेव युवक मंडळ अध्यक्ष ओमकार कजबजे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, श्रेयश रोडे, सुयोग बारटक्के, शिंपी समाज बांधव, सदस्य, महिला मंडळ अध्यक्षा जानकी कजबजे नगरसेविका नेहा पांढरकामे उपस्थित होते.
सदर संकलित रक्त जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग येथे संक्रमित करण्यात येणार असून, डॉ. दीपक गोसावी, हेमकांत सोनार, उमेश पाटील, आकाश सावंत, महेश घाडे, तळा प्राथमिक आरोग्य औषध अधिष्ठाता निलेश कार्लेकर यांनी सहकार्य करून शिबीर संपन्न झाले.