। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर किलोमीटर 38.00 च्या दरम्यान झालेल्या ट्रक आणि कारच्या अपघातात एक जण मृत्युमुखी झाल्याची घटना सकाळी 9 च्या सुमारास घडली. या अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग पोलिस आणि अपघात ग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने जखमींना वाहनातून बाहेर काढत रुग्णालयात दखल केले. आणि अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.