। चौल । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्ष व संजिवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल याच्या संयुक्त विद्यमाने चौल येथील मुखरी गणपती मंदिरात शनिवारी (दि.13) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सर्वासाठी खुले असून यात लहान मुलेदेखील सहभागी होऊ शकतात. शिबीरात सर्व प्रकारच्या आजारांवर तपासणी करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. अधिक माहितीसाठी 8591415281, 8591416680 या क्रमांकावर संपर्क साधावा.