। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.