डायलिसीस मशीनची केली पाहणी
| मुरुड | वार्ताहर |
संजीवनी आरोग्य संस्था मुरुड आणि डॉ. तात्याराव लहाने संचलित डायलिसिस सेंटरला शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी भेट देऊन डायलिसि मशीनची पाहणी केली. तसेच भविष्यातही संस्थेच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. डायलिसिससाठी येणार्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने डायलिसिसच्या मशीनची गरज संजीवनी आरोग्य संस्थेला भासत होती.
शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते राहील कडू यांनी याविषयी चित्रलेखा पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि ही समस्या त्यांच्यापुढे मांडली. चित्रलेखा पाटील यांनी तात्काळ संस्थेला मदतीचे आश्वासन दिले आणि काही दिवसातच डायलिसिसचे मशीन सुपूर्द केले. काहीच दिवसांपूर्वी या मशीनचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्याच मशीनची पाहणी करण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी गुरुवारी संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेच्या पदाधिकार्यांनी त्यांचा सन्मान करीत आभार मानले. भविष्यातही संस्थेच्या पाठीशी आपण उभे राहावे, अशी विनंती केली. तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी केली असता चित्रलेखा पाटील यांनी ती तात्काळ मान्य करुन देण्याचे कबूल केले. याबाबत संस्थेकडून त्यांना धन्यवाद देण्यात आले.