। तळा । प्रतिनिधी ।
तळा येथील जी.एम.वेदक कॉलेज ऑफ सायन्सची विद्यार्थिनी प्रार्थना प्रसन्ना बेटकर हिने मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवात यश प्राप्त केले आहे. महोत्सवातील विविध कला प्रकारात विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. महोत्सवात रायगड दक्षिण झोनमधून वकृत्व या कलाप्रकारात प्रार्थना प्रसन्ना बेटकर या विद्यार्थिनीने पात्रता फेरीत तृतीय क्रमांक मिळून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वेदक, सचिव उमेश वेदक, प्राचार्य डॉ. विजय सरोदे, डॉ. नानासाहेब यादव, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पी. बी. अभंगे यांनी प्रार्थना बेटकरचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.