आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
| पनवेल | प्रतिनिधी |
कळंबोलीत श्री सिद्धीविनायक मित्र मंडळाच्या वतीने मोफत नेत्रतपासणी शिबीर माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कोकण शिक्षक मतदारसंघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना काळानंतर यावर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असताना, सामाजिक बांधिलकी जपत कळंबोलीत माजी नगरसेवक गोपाळ यांच्या पुढाकाराने श्री राम आनंदी सेवा प्रतिष्ठान कळंबोली आणि आर झूनझूनवाला चॅरिटेबल ट्रस्ट शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. याचा सुमारे 120 नागरिकांनी लाभ घेतला. तसेच या गणेशोत्सवात सुमारे 130 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
हे शिबीर संपन्न करण्यासाठी श्री सिद्धीविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळा फडतरे, सचिव दिनेश पाटील, सुनील भेंडे, सूरज रुपवते, जगन पारखे, एकनाथ सूर्यवंशी आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.