। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
शेतकरी शेती करीत असतांना वातावरण केव्हा चांगले असेल यांची शास्वती नाही. शिवाय ओला किंवा कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान होते. मातीमध्ये टाकलेला पैसा वसुल होत नाही. शिवाय डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी वर्गापुढे अनेक समस्या निर्माण होतात. तसे होवू नये पिकाला सर्वक्षण मिळावे, या उद्दात विचारांतून शासनाने खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या योजनेत शेतकर्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 15 जुलै 2021 अशी होती. तथापि केंद्र शासनाचे दिनांक 15 जुलै 2021 च्या पत्रान्वये योजनेत शेतकर्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती दिनांक 23 जुलै 2021 अशी केली आहे. तरी शेतकर्यांनी पिक विमा संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
त्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.कर्जदार शेतकर्यांनी आपण पिक कर्ज ज्या बँकेतून घेतले आहे. तिथे व बिगर कर्जदार शेतकर्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रमध्ये जाऊन आपला पिक विमा भरावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ-नारनवर यांनी तालुक्यातील शेतकर्यांना केले आहे.