| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ नळपाणी योजनेची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून काढण्यात आली आहे. राज्य सरकारच्या स्वच्छ पाणी आणि स्वच्छता मिशन यांचे मार्फत निविदा ओनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर रोजी 25 कोटी 60 लाख रुएए खर्चाची नेरळ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना शासनाच्या वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. नेरळ प्रादेशिक नळपाणी योजना साठी शासनाने 41 कोटींचा निधी मंजूर केला असून, योजनेसाठी आवश्यक असलेले पाईप हे शासन खरेदी करून देणार आहे. या योजनेतील खर्चाची रक्कम वगळून 25 कोटी 60 लाख रुपये खर्चाच्या योजनेची निविदा प्रसिद्ध झाली आहे.







