वृद्ध महिला जखमी, तीन दिवसांनंतरही पोलिसात गुन्हा दाखल नाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बुधवारी अलिबाग तालुक्यातील तळवली येथे एका वृद्ध महिलेला पाडून तिचे मंगळसूत्र पळविण्याची धक्कादायक घटना घडली आहे यात महिलेचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेला तीन दिवस होवूनही अद्याप अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
सुनंदा सीताराम राऊत. मु – नवेदर बेली, पो – कुरुळ, ता- अलिबाग या नवेदर बेली इथून तळवली येथे त्यांची बहीण माधुरी मधुकर पाटील यांच्या घरी जात होत्या. तळवळी स्टॉप ते बहिणीचा घरी चालत जात असताना तळवळी स्टॉप इथून सुमारे 11:15 ते 11:30 च्या दरम्यात तळवळी गावातून एक सफेद रंगाच्या मोटार सायकलवर एक इसम समोरून आला. त्याने चालत्या मोटासायकल वरून सुनंदा राऊत यांच्या गळ्यामधील दोन तोळ्याची सोन्याची माळ खेचून नेली आणि त्यांना धक्का दिला. त्यामुळे पडून त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांचा हात फ्रक्चर झाला. मात्र सदर चोरट्याने पळ काढला.
यासंदर्भात अलिबाग पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता असा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. तर पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.