। उरण । वार्ताहर ।
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवरात्रौत्सव निमित्त रविवारी (दि.2) प्रतीक सुधीर मुंबईकर यांच्या रँकर्स अकॅडेमी, कोप्रोली चौक येथे उरण तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एकूण नऊ महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हेमलता पाटिल, डॉ.रंजना म्हात्रे, श्वेता भोईर, अंजली जोशी, स्मिता म्हात्रे, राजश्री पाटील, अॅड. वर्षा पाठारे, रचना ठाकूर, निता डाऊर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटिल, विठ्ठल ममताबादे, प्रेम म्हात्रे, सुरज पवार, सुविध म्हात्रे, सुनिल वर्तक, माधव म्हात्रे, कुमार ठाकूर, हेमंत ठाकूर, शुभम ठाकूर, प्रणित पाटिल, साहिल म्हात्रे, समीर पाटिल, प्रकाश म्हात्रे आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सल्लागार तथा प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी केले.