| आगरदांडा | वार्ताहर |
फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून सुपेगाव पर्यटन संकुल येथे वन्यजीव सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम मध्ये क्षेत्रीय वनकर्मचारी,महिला बचत गट सुपेगाव यांना वन्यजीव संरक्षणबाबत तसेच फणसाड जैवविविधता बाबत छायाचित्र प्रदर्शन करून मार्गदर्शन करण्यात आले,त्यानंतर ग्रीन वर्क ट्रस्ट यांनी नवीन गिधाड इ-कार्ड च फणसाड रेंज स्टाफ च्या हस्ते प्रसिद्ध केले , त्यानंतर सर्व वनकर्मचारी यांच्यासोबत विविध उपक्रम घेण्यात आले आहेत.
यावेळी गावातील शाळेतील मुले,महिला यांना वन्यप्राणी बाबत तसेच फणसाड अभयारण्य बाबत पीपीटी सादरीकरण तसेच छायाचित्रे प्रदर्शनद्वारे मार्गदर्शन करून वन्यप्राणी संवर्धनबाबत जनजागृती करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना जंगल सफर या विषयावर चित्रे काढण्याचा विषय देण्यात आला होता. या शाळेतील कलाशिक्षक अमर दरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.इयत्ता पाचवी ते आठवी च्या गटात प्रथम क्रमांक शुभ्रा संतोष जमनु द्वितीय क्रमांक कस्तुरी जितेंद्र दिवेकर,तृतीय क्रमांक अन्वी निलेश बिरवाडकर याना मिळाला आहे. इयत्ता आठवी च्या गटात प्रथम क्रमांक सिद्धी विनायक शेडगे,द्वितीय क्रमांक भक्ती बाळासाहेब फत्तेपुरे,तृतीय क्रमांक ओम जनार्दन पाटील याना मिळाला आहे.
सदरच्या कार्यक्रम प्रसंगी फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर,काशीद वनपाल एस.एल.शिंदे,सुपेगाव वनपाल एस व्ही.तांडेल,नांदगाव वनपाल ए.पी.पाटील.ग्रीन वर्क ट्रस्ट चे संस्थापक निखिल भोपळे व त्यांचे सर्व सहकारी,अंशू फाऊडेशन चे निलेश गुंड व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.