फलकामुळे वाहनचालक, प्रवाशांमध्ये संभ्रम; एमएसआरडीसी प्रशासनाचे अजब काम
। सुधागड-पाली । गौसखान पठाण ।
मात्र जिल्ह्यात तर सोडा मात्र देशातही उपलब्ध नसणार्या प्राण्याचे फलक चक्क वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर लावले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या मार्गावरून जाताना वाहनचालक व प्रवाशांना येथे कांगारुचे चित्र असलेले फलक दिसल्यामुळे याठिकाणी कांगारुंचे वास्तव्य असून खबरदारी घेण्याची चर्चा सध्या रंगली आहे. वास्तविक या मार्गावर माकडे, डुक्कर, भेकर आदि प्राणी सर्रास येतात. त्यामुळे फलकावर या प्राण्यांचे चित्र असणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नसल्याने या मार्गावरून खरंच आफ्रिकेतील कांगारू आले की, काय असेच वाटत आहे.
सुरक्षेसाठी जंगल भागातून वाहने जातांना येथे असणारे प्राणी कळावेत, तसेच रस्त्यावर येणार्या वेगवेगळ्या प्राण्यांना वाहनांचा धक्का लागून अपघात होऊ नये, यासाठी फलक लावण्यात येतात. जेणेकरुन वाहनचालक सतर्क होतील. मात्र कांगारुंचे फलक लावल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
कोट 1
कांगारू हा प्राणी भारतातील नाही. तो फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो. त्यामुळे या मार्गावर आढळणारे प्राणी जसे माकड, रानडुक्कर आदींची चित्र असलेले फलक लावले असते तर ते वाहन चालक व प्रवाशांना कळले असते. अन्यथा कांगारूचे चित्र पाहून बहुतांश लोकांना अर्थबोध होत नाही. त्यांचा गोंधळ होतो. त्यामुळे येथे स्थानिक प्राण्यांची चित्रे असावीत. शंतनू लिमये, वाहनचालक, पाली
कोट 2
या मार्गावर जंगल भाग किती लांब आहे, त्याबाबतच्या माहितीसाठी तेथे अशा प्रकारचे प्राण्यांचे चित्र असलेले फलक लावले आहेत. कांगारुचे चित्र असलेले फलक असल्याची बाब निदर्शनास आली असून लवकरच हे फलक बदलण्यात येतील. सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी