। मुंबई । प्रतिनिधी ।
अंमली पदार्थाच्या गोदामावर कारवाई करून 50 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियत्रण विभागाला यश आले आहे. याप्रकरणी गुजरातमधूनही 10 किलो एमडी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत 120 कोटी रुपये आहे. याप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे.