। माणगाव । प्रतिनिधी ।
महामार्गावर माणगावजवळ तळेगाव हद्दीत केमिकलचे ड्रम वाहुन नेणार्या टेम्पोला शुक्रवारी (दि.7) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत केमिकलच्या ड्रमसहित संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
भिवंडी येथून महाडकडे केमिकल वाहून आणणार्या आयशर टेम्पो एम एच 06 बीडब्ल्यू 5961 या गाडीला आग लागली. या आगीत केमिकलच्या ड्रमसहित संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.