| मुरूड | प्रतिनिधी |
गेल्या अनेक दिवसांपासून मुरुडच्या बाजारपेठेत एका माथेफिरू महिलेने हैदोस घातला असून, त्यामुळे व्यापारी अक्षरशः हैराण झाले आहेत. याठिकाणी वेळप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुरुड बाजारपेठेमध्ये एक माथेफिरू वेड लागलेली बाई रात्रंदिवस दहशत माजवत फिरत असते. तिची भाषा समजून येत नाही. बाजारपेठेतील व्यापार्यांच्या दुकानाबाहेर घाण करून किंवा दारावर किंवा शटरवर काहीतरी घाण उडवून रंग उडवून रागारागाने निघून जाते. परंतु, तिच्या दहशतीमुळे तिला कोणीही बोलायची हिंमत करत नाही.
त्यामुळे मुरुड बाजारपेठेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बाजारपेठेतील नागरिकांनी मुरुड पोलीस ठाण्यात तसेच मुरुड नगरपरिषद यांच्याकडे तोंडी व लेखी स्वरूपात अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, आजतागायत याची दखल कोणीही घेतली गेली नाही. तरी उद्या काही अनुचित प्रसंग घडला तर याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.