। महाड । प्रतिनिधी ।
बंडखोरी केल्यानंतर प्रतिष्ठा पणाला लावत आ. भरत गोगावले ग्रामपंचायत निवडणूकीत बाळासाहेबांची शिवसेना या गटातर्फे उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. मात्र गेली कित्येक वर्षे त्यांनी केवळ जनतेची फसवणूक करीत कोणतीही विकासकामे न केल्याने जनतेने त्यांच्याच गावात त्यांना जोर का झटका दिला आहे.
गोगावलेंच्या काळीज खरवली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकविला आहे. सरपंचपदी काँग्रेसचे चैतन्य म्हामूणकर यांना जनतेने कौल दिला असून हा गोगावलेंचाच पराभव असल्याचे त्यांनी सांगितले.