अॅडलेडमध्ये 13 डिग्री उष्णतापमान आणि अधूनमधून पडणार्या पावसांच्या सरींनी टिम इंडियाचे स्वागत केले. अॅडलेड शांत शहर टुमदार छोट्या घरांचे क्रिकटेच्या जगताचे महान दैवत सर डॉन बॅडमन यांची ही कर्मभूमी. खरंतर ब्रॅडमन यांचे जन्मगाव बावरल. सीडनीच्या जवळचे, खेळले न्यू साऊथ वेल्ससाठी ते खेळले. पण शांत, वनश्रीने नटलेले अॅडलेड त्यांना आवडायचे. म्हणून त्यांचे वास्तव्याचे ठिकाण हेच होते.
याच अॅडलेडमध्ये भारतीय संघ टवेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला पराभव पर्थ येथील सामन्यात चाखल्यानंतर दाखल होत आहे. बांग्लादेशसारख्या संघाविरूद्ध लढत भारताला अतिशय महत्वाची आहे. कारण या लढतीमधील विजय त्यांचे अंतिम 4 संघांमधील स्थान जवळजवळ निश्चित करणार आहे. मात्र याच प्रयत्नातील मोठा अडसर आहे, हवामानाचा स्थानिक हवामान खात्यावर अंदाजानुसार उद्या मंगळवारी पावसाच्या सरी पडतील. बुधवारी भारताच्या सामना जेव्हा बांग्लादेशाशी होणार आहे, त्या दिवशी पावसाचा शिडकावा काही प्रमाणात कमी असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की सामना पावसामुळे रद्द होणार नाही.
खरंतर पावसाच्या कलमाचा जवळजवळ सर्वच संघाना फाटका बसला आहे. भारतीय संघाचे मात्र आतापर्यंतचे तिन्ही सामने पूर्ण झाले आहेत. अॅडलेडमध्ये भारतासाठी हवामानापेक्षाही खरी डोकेदुखी आहे. संघाचा समतोल कसा राखायचा याची. कप्तान रोहित शर्मा याला अद्यापी सूर गवसत नाही. त्याचवेळी त्याचा सलामीचा जोडीदार के एल राहुल हा देखील नव्या चेंडूवर सध्या चाचपडताना दिसतोय. आशिया खंडांतील संथ आणि चेंडूला कमी उसळी आणि कमी वेग देणार्या खेळपट्ट्यांवर अनेकांनी वेळोवेळी हात साफ केले होते. पण ऑस्टे्रलियातील खेळपट्ट्यांवर खेळताना फलंदाजीचा उत्तम दर्जाच लागतो. तो क्लास कोहलीने दाखविला, सूर्यकुमार यादवने दाखविला. कमरेच्यावर चेंडू उसळला की भारतीय फलंदाजांची समस्या सुरू होते. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदांजांनी भारतीयांचा तो दोष पुन्हा एकदा सर्वांसमोर आणला.
सलामीच्या जागेसाठी तिसरा नियमित फलंदाज नसावा यासारखी आश्यर्चचकित करणारी गोष्ट नाही. दोन्ही सलामीवीर अपयशी ठरत असताना आता काय करायचे हा प्रश्न संघासमोर निर्माण झाला आहे. सातत्याने अपयशी ठरलेल्या के.एल.राहुलच्या जागी ॠषभ पंतला खेळवायचे का याचा विचार सध्या सुरू आहे. 37 वर्षीय दिनेश कार्तिकला स्थान देण्याच्या प्रयत्नात आपण तरूण, उदयोन्मुख ॠषभ पंतवर सतत अन्याय करतोय. दोन वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वासाठी ऑस्ट्रेलियावर मालिका विजय मिळविणार्या संघाच्या फलंदाजीचा कणा खरंतर हाच ॠषभ पंत होता. दुदैवाने राहुल द्रविडच्या भारतीय संघ घडविण्याच्या योजनेमध्ये पंत बसत नाही. अनुभवाला तोड नाही हे जरी खरे असले तरीही पंतसारख्या नवोदिताला बसवून दिनेश कार्तिकसारख्या सातत्य नसलेल्या खेळाडूवर आपण किती काळ आणखी विश्वास टाकणार हा प्रश्न आहे.
भारतीय संघाची आणखी एक वृत्ती अनाकलनीय वाटते. हुडा सारख्या नवोदित खेळाडूला पदार्पण करण्याची संधी, दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाविरूध्द देण्यात कोणता मुत्सदीपणा होता? फिरकी गोलंदाजाची निवड हा निर्णय देखील सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. फलंदाजीच्या वजनावर अश्विनची अष्टपैलू खेळाडू म्हणून गणना करणे अयोग्य आहे. टवेन्टी-20 क्रिकेटमध्ये अधिक अष्टपैलू खेळाडू संघांत असावेत असा संकेत आहे. आपल्या संघात एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे; तो म्हणजे हार्दिक पंड्या! अर्षदीपच्या डावखुर्या वेगवान गोलंदाजीने आपली इभ्रत काही प्रमाणात राखली. त्याने बुमराच्या जागेवर आपली केलेली निवड चुकीची वाटू दिली नाही. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत देखील घेतली.
बांग्लोदशाविरूध्द सामन्यात खेळपट्टी, हवामान सामन्यातील षटकांची संख्या यांचा विचार करूनच संघांची निवड करावी लागेल. प्रतिस्पधीर्र् संघांची ताकद कमी लेखून आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा पुन्हा संधी देणे भारताला महाग पडू शकेल. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यातील पराभवामुळे झालेले गुणसंख्या आणि मानसिक पातळीवरील नुकसान भरून काढण्यासाठी मेहनत करावी लागेल. ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्ट्यांवर यजमान ऑस्टे्रलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर देण्याइतकी आपली फलंदाजी सक्षम नाही. हे कटू सत्य स्वीकारूनच मार्गाक्रमण करायचे आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.