। रेवदंडा । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रा.प.हद्दीतील पाल्हे येथे कार्तिकी एकादशीचे शुभदिनी श्री विठ्ठल रखुमाई उत्सवाच्या निमित्ताने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (दि.4) सकाळी अकरा वाजता शेकापक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पाल्हे ग्रामस्थ मंडळ, व वनदेव क्रिडा मंडळ यांनी जय भवानी मित्रमंडळ व सुशांती महिला मंडळ, पाल्हे यांच्या सहकार्याने पाल्हे येथे श्री विठ्ठल रखुमाई उत्सव व कबड्डीचे सामने आयोजीत केले होते. या प्रसंगी माजी जि. प. सदस्य व्दारकानाथ नाईक, शेकापक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील, नागाव ग्रा.पं.माजी सरपंच नंदु मयेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते राजू मयेकर, नागाव ग्रा.प.सरपंच निखिल मयेकर, सदस्य हर्षदा मयेकर, सुरेंद्र नागलेकर आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती. प्रारंभी शेकापक्षाचा जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पाल्हे ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवर मंडळीचा सुध्दा सत्कार करण्यात आला.
चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत कबड्डी मैदान क्रमांक एकचा शुभारंभ तर अनिल पाटील यांचे हस्ते मैदान क्रमांक दोनचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कबड्डी स्पर्धेत एकूण 32 निमंत्रीक संघाने सहभाग होता. या स्पर्धेचे निरिक्षक हेमंत राऊळ असून पंच प्रमुख अनिल राऊत हे आहेत. तर रणजीत तुणतुणे, अविनाश गोंधळी, सचिन पाटील, नवनाथ पोईलकर, महेंद्र नाईक, निकेश मगर, मदन पाटील, जगदीश पोईलकर, सतिश भगत, अभिजीत पाटील, प्रविण कदम हे पंच म्हणून काम पहाणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी निखिल मयेकर यांचेकडून रूपये 21 हजार व आकर्षक चषक,व्दितीय क्रमांकासाठी रसिका रघूनाथ प्रधान याचेकडून रूपये 15 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकासाठी सुरेंद्र नागलेकर यांचे कडून रूपये 10 हजार रोख व आराध्य भगत यांचेकडून कै. मुकूंद बाबाजी भगत यांचे स्मरणार्थ आकर्षक चषक तसेच चतुर्थ क्रमांकासाठी सायली संजय नाईक यांचे वतीने रूपये 10 हजार रोख व कै. अक्षय विलास गुरव स्मरणार्थ जयदिप जनार्दन भगत यांचे वतीने आकर्षक चषक तसेच शिस्तबंध्द संघास कै. जगदीश काशिनाथ म्हात्रे यांचे स्मरणार्थ सिध्देश जगदीश म्हात्रे यांचे वतीने आकर्षक चषक, तसेच सर्वोकृष्ट खेळाडूस कै. सुधाकर दत्तात्रेय गुरव यांचे स्मरणार्थ योगेश सुधाकर गुरव यांचे वतीने आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट पकड व उत्कृष्ट चढाई तसेच पब्लिक हिरो यांस वनदेव क्रिडा मंडळ, पाल्हे यांचे वतीने आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.