। इराण । वृत्तसंस्था ।
इराणमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागत असल्याची घटना समोर आली आहे. मोठं जलसंकट ओढावलं असून लोकं रस्त्यावर उतरले आहेत. पाण्याच्या मुद्यावर आंदोलन करणार्या आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांकडून कारवाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहे. आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला आहे. इराण सरकारने याबाबत अधिक सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र पाश्चिमात्य देशांमधील माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे.
पाण्यावरून झालेल्या आंदोलनादरम्यान काही जणांचा मृत्यू झाला. मृत्यूबाबत माहिती देताना अधिकार्यांनी या मृत्यूला सुरक्षा दलाचे जवान जबाबदार नाहीत. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात एका व्यक्तीने गोळीबार केला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असं म्हटलं आहे. तसेच ही घटना अलीगूरदर्ज या ठिकाणी झाली. इराण सरकारविरोधी गटांची वृत्तसंस्था ह्युमन राइट्स एक्टिविस्ट्स वृत्त संस्थेच्या हवाल्याने पाश्चिमात्य माध्यमांनी दहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. तर 31 आंदोलकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पाणीटंचाईविरोधात गेल्या आठवड्यात पश्चिम प्रांतातील लोरस्तान येथे आंदोलनाची सुरुवात झाली.