। सातारा । वृत्तसंस्था ।
शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र ही कारवाई सुरु असतांना तिथे आणखी तीन कबरी आढळून आलेल्या आहेत. साताऱ्याच्या जिल्हाधिका रुतेश जयवंशी यांनी माहितीला दुजोरा दिलाय.
१९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. गुरुवार (दि.१०) अफझल खानाच्या कबरीजवळ झालेले अतिक्रमण हटवण्यात आले. यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली होती. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमध्ये इतर कबरींना धक्का लावण्यात आलेला नाही. त्या कबरींभोवती जाळी लावण्यात आलेली आहे. मात्र या कारवाईदरम्यान अफझल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आलेल्या आहेत. यासंबंधी आणखी माहिती घेण्याचं काम महसूल प्रशासन करीत आहे.