| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोअर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवते. रोटरी क्लबचे बरेचसे सदस्य डॉक्टर्स आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबाग तर्फे जिल्हा रुग्णालयातील कोव्हीड आय सी यू व आयसोलेशन कोव्हीड वॉर्ड येथे मागील बऱ्याच महिन्यांपासून कोव्हीड रुग्णसेवा दिली जात आहे.
आयसोलेशन वॉर्डात राउंड घेत असताना रोटरीयन डॉ किरण नाबर व डॉ अनिल डोंगरे यांच्या निदर्शनास आले कि ऑक्सिजन चालु असलेला रुग्ण जेव्हा टॉयलेट/वॉश रूमला जातो तेव्हा त्यांची ऑक्सिजनची मात्रा कमी होते. अशा वेळी बेड पॅन चेअर्स खुप उपयोगी ठरू शकतात….. हि बाब ध्यानात घेऊन काही बेड पॅन चेअर्स डोनेट करायचे असे क्लबतर्फे ठरवण्यात आले असे क्लबचे अध्यक्ष रोटरीयन डॉ राजेंद्र चांदोरकर यांनी यावेळी नमुद केले.
“उद्देश प्रामाणिक व सामाजिक असल्याने आम्ही त्याची उचल धरली” असे ते पुढे म्हणाले. सिव्हिल सर्जन डॉ सुहास माने तसेच आर एम ओ डॉ अनिल फुटाणे यांच्याबरोबर चर्चा करुन बुधवारी(28/07/2021) या चेअर्स आयसोलेशन वॉर्ड येथे त्यांच्या उपस्थितीत सरकारी सरकारी रुग्णालयास सुपूर्द केल्या गेल्या. पैकी दोन क्लब तर्फे तर उर्वरित चार क्लबचे सदस्य डॉ के वाय कुलकर्णी, रोटरीयन सुधीर काटले (ओंकार मेडिकल स्टोअर्स), रोटरीयन निमिष परब (त्यांचे सासरे कै. यशवंत नारायण शिंदे यांच्या स्मरणार्थ) तसेच डॉ निलेश म्हात्रे (सौ. नंदा व श्री बाळाराम म्हात्रे – नागझरी ) यांजकडुन देण्यात आल्या.
“रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोअरने आपली सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम आज येथे पार पाडला आहे” असे प्रशंसोदगार सिव्हिल सर्जन डॉ सुहास माने यांनी यावेळी काढले व क्लबची भरभरून प्रशंसा करुन क्लबच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या छोटेखानी कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अलिबाग तर्फे अध्यक्ष डॉ राजेंद्र चांदोरकर, सचिव आनंद वालेकर, रोटरीयन सदस्य कुमार जोगळेकर, ऍडव्होकेट भूषण जंजिरकर, गौरव माळी, डॉ दिपक गोसावी, डॉ के वाय कुलकर्णी, डॉ सुनील भोपाळे, डॉ अनिल डोंगरे, डॉ महालिंग क्षीरसागर, आर एम ओ डॉ अनिल फुटाणे, मेट्रन मोरे मॅडम तसेच आय. एम. ए. अलिबाग चे अध्यक्ष रोटरीयन डॉ विनायक पाटील हे उपस्थित होते.