। मुंबई । प्रतिनिधी ।
26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यात 197 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर, 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये केवळ भारतीय नाही तर परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले होते. या कारवाईमध्ये अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडत त्याला फासावर लटकवले.