अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रुग्णांची संख्या घटत असून आज गुरुवारी 29 जुलै रोजी कोरोनाच्या 44 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 79 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 हजार 465 झाली आहे. यापैकी 531 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 17 हजार 215 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 719 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.