| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोकण दौर्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मंगळवारपासून रायगड जिल्हा दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात ते प्रत्येक तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेवून संवाद साधणार आहेत. मंगळवारी या दौऱ्याला महाड येथून प्रारंभ होणार आहे.
(दि.6) सायंकाळी 4 वाजता महाड, पोलादपूर पदाधिकारी बैठक, मुक्काम. (दि.7) इंदापूर येथे सकाळी 11 वाजता श्रीवर्धन, इंदापूर, म्हसळा तालुका पदाधिकारी बैठक, सायंकाळी 4 वाजता अलिबाग, मुरुड पदाधिकारी बैठक, मुक्काम. (दि.8) सकाळी 11 वा. पेण, पाली पदाधिकारी बैठक, दुपारी 4 वाजता कर्जत येथे बैठक. (दि.9) सकाळी 10 वाजता पनवेल, उरण येथील पदाधिकारी यांची बैठक होणार आहे.