। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील करंजा बंदराज मच्छीमार बोटीला आग लागली. ही घटना मंगळवारी घडली. याबाबत माहिती मिळताच 4 अग्निशमन दलाच्या गाडीने येऊन आग आटोक्यात आणली आहे. आगीत जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.करंजा बापदेव पाडा येथील गजानन कोळी यांची मासेमारी करणारी बोट समुद्र किनारी उभी असताना आग लागली. बोटीवरील खलाशी जेवण बनवीत असताना आग लागली असल्याचे बोलले जात आहे.
आगीचे निश्चित कारण समजले नाही. आगीत जिवीतहानी झाली नसली तरी आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.