| लातूर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने, लातूर जिल्हा कबड्डी असोशिएशन बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ-अहमदपूर यांच्या सहकार्याने दि. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत 33व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून निवडण्यात आलेला महाराष्ट्राचा किशोर व किशोरी गटाचा संघ डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झारखंड येथे होणार्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. अहमदपूर-लातूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर होणार्या या स्पर्धेतील दोन्ही विभागात सर्व 25 संलग्न जिल्हा संघटनांनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धा 6 मातीच्या क्रीडांगणावर सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येणार आहे. गतवर्षीच्या मानांकानुसार संघाची सहा गटात विभागणी करण्यात आली असून ती राज्य संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रासार माध्यमाना कळविली आहे.
स्पर्धेची गटवार विभागणी खालीलप्रमाणे.
किशोर गट :- अ गट :- 1)परभणी, 2)पालघर, 3)अहमदनगर, 4)सिंधुदुर्ग.
ब गट :- 1)नंदुरबार, 2)जालना, 3)मुंबई उपनगर, 4)धुळे.
क गट :- 1)कोल्हापूर, 2)सातारा, 3)ठाणे, 4)सोलापूर.
ड गट :- 1)सांगली, 2)मुंबई शहर, 3)औरंगाबाद, 4)लातूर.
इ गट :- 1)पुणे, 2)रायगड, 3)रत्नागिरी, 4)बीड.
फ गट :- 1)हिंगोली, 2)जळगांव, 3)नाशिक, 4)उस्मानाबाद, 5)नांदेड.
किशोरी गट :- अ गट :- 1)सांगली, 2)रायगड, 3)सिंधुदुर्ग, 4)नांदेड.
ब गट :- 1)पुणे, 2)मुंबई शहर, 3)रत्नागिरी, 4)जालना.
क गट :- 1)मुंबई उपनगर, 2)ठाणे, 3)उस्मानाबाद, 4)जळगांव.
ड गट :- 1)कोल्हापूर, 2)नाशिक, 3)औरंगाबाद, 4)लातूर.
इ गट :- 1)अहमदनगर, 2)सोलापूर, 3)सातारा, 4)हिंगोली.
फ गट :- 1)परभणी, 2)पालघर, 3)धुळे, 4)बीड, 5)नंदुरबार.