थर्टीफर्स्टसाठी हॉटेल्स, लॉजेसचे बुकींग हाऊसफुल्ल
| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
नाताळचा सीझन जोरात गेल्याने सुखावलेल्या मुरुडकरांना आता वेध लागलेत येणार्या थर्टीफर्स्टचे. हा सीझनही असाच जोरात जाणार याचा अंदाज आतापासूनच येऊ लागला आहे. शहर आणि परिसरातील सर्व हॉटेल्स, लॉजेस, फार्महाऊसेच बुकींग हाऊसफुल्ल झाले आहे. याशिवाय अन्य पर्यटकही दोन दिवसात भरपूर मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येणार्या पर्यटकांच्या वाहतुकीचे नियोजन कसे करायचे याचीच चिंता पोलीस यंत्रणेला लागली आहे.
मुंबई,पुणे,ठाणेमधील पर्यटकांना मुरुडच्या किनार्याने भुरळ घातली असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून आलेले आहे. मुरुड हे जवळचे पर्यटन स्थळ असल्याने व स्वच्छ सुंदर विशाल समुद्र किनारा. समुद्रात उभे असलेला जंजिरा ,पदामदुर्ग हे जलदुर्ग,,दत्त मंदिर, इदगाह ,गारंबी , खोकरी अशा पर्यटन स्थळामुळे मुरुड पर्यटकांच्या पसंतीला आले आहे. यावेळी थर्टीफर्स्ट शनिवारी आला आहे.त्यापाठोपाठ न्यू ईअर रविवारी येत असल्याने या दोन दिवसांत धम्माल करण्यासाठी पर्यटकांनी मोठे प्लॅन आखले आहेत. दरवर्षी पर्यटन महोत्सव असल्याने रात्री बारा वाजेपर्यंत समुद्रात स्टेजवर संगीत कार्यक्रम असतात. परंतु यावषीर्र् संगीत कार्यक्रम नसल्याने पर्यटक नाराज आहेत.
पार्किंगची समस्या जटील
यावर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येणार असल्याने त्यांची हजारो वाहन मुरुड शहरात आल्यावर त्यांच्या पार्कींगचा प्रश्न मोठा जटील होणार आहे. त्यासाठी पोलिसांना पूर्व नियोजन करावे लागणार आहे. दरवर्षी पर्यटन महोत्सव समिती वाहतुकीचे नियोजन पोलीस आणि नगरपालिका चे अधिकारी एकत्र बसून करतात .परंतु ह्यावर्षी पालिकेचा सहभाग नसल्याने पोलिसांवर ताण येणार आहे . समुद्रकिनारी वाळूचा बंधा़र्यांवर पर्यटकांची शेकडो वाहने पार्कींग होत असत परंतु ह्यावर्षी तेथे पाळणे व खेळणी बसण्यात आल्याने 60 फूट बाय 500 फूट जागा मेरीटाईन बोर्डान पाळणे व्यावसायिकाने भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांना जागा अपुरी पडणार. समुद्रालगत असणारा रास्ता हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलयाने प्रत्यक पर्यटक आपले वाहन त्या रास्तवरून नेतो त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते म्हणून ह्यावर्षी पोलिसांना सतर्क राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मुरुडला मोठ्या संख्येने येणार ,परंतु पर्यटन महोत्सवाचे आयोजन नसल्याने पर्यटक नाराज होत आहेत . स्वतःची वाहने घेऊन येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात आहेत. किनार्यावरील वाहने पार्किंगची जागा पाळणे व खेळासाठी दिल्याने पर्यटकांच्या गाड्या लावणार कुठे हा प्रश्नच आहे ,मुरुड शहराचा पार्कींगचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नियोजन करण्याची गरज आहे.