कृषी विभागाकडून पाहणी, ग्रामस्थांशी संवाद
| अलिबाग | वार्ताहर |
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर व उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांच्यासोबत जिल्ह्यातील 15 तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी स्वदेस फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आलेल्या माणगाव तालुक्यातील निवी व तळा तालुक्यातील वावे हवेली या स्वप्नातील गावांना नुकतीच भेट दिली.
या भेटीदरम्यान गावातील पायाभूत सुविधा, सामाजिक विकास,आर्थिक विकास व गावाची एकजूट आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यामार्फत गावात स्थापन केलेल्या विकास समिती व ग्रामस्थ यांनी स्वच्छ, सुंदर,आत्मनिर्भर व सक्षम विकास समिती यांची विकासाकडे वाटचाल दिसून आली. स्वदेस फाउंडेशन व शासन एकत्र येऊन व ग्रामस्थ यांच्या मदतीने विकासाची वाटचाल नक्कीच होईल, अशी अपेक्षा ठेवून गावाची वाटचाल सुरू आहे. स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी स्वदेस फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती कृषी अधिकार्यांना करून देवून स्वदेस टीमसोबत कृषी अधिकार्यांशी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.
गाव विकास समितीने झालेल्या विकास कामांचे सादरीकरण केले, गावाने सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी उद्दिष्टे पूर्ण करीत आरोग्य, शिक्षण, उपजीविका, शेती, कौशल्य विकास व पायाभूत सुविधा यांची स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव घडविले आहे. गावामध्ये गावकर्यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची अधिकार्यांनी पाहणी केल्यानंतर ते अधिकारी भारावून गेले.गाव विकास समिती निवी व वावे हवेली यांनी स्वप्नातील गावची संकल्पना, केलेले नियोजन, गाव विकास आराखडा , त्यानुसार नियोजित वेळेत पूर्ण केलेली कामे यांचे उत्तम पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. तसेच शेती आणि शेती पूरक व्यवसायातून केलेली प्रगती व पुढे करावयाची कामे आणि जबाबदारी पाहून सर्व अधिकारी वर्गाने गाव विकास समिती चे कौतुक केले. त्याचप्रमाणे जी कामे झाली आहेत, ती सर्व आदर्श कामे रायगड मधील इतर तालुक्यातील गावागावात कशी केली जातील यासाठी सर्वांना प्रोत्साहन दिले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक तसेच स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार, विकास खरमाळे ,माणगाव तालुका कृषी अधिकारी एन.वाय.घरत, माणगाव व तळा मंडळ कृषी अधिकारी सागर वाडकर, कृषी सहाय्यक मधूकर शेंडे व योगेश कोळी, आत्मा तालुका व्यवस्थापक प्रमोद शिंदे, शिवतेज ढऊल, भीमराव भालेराव, रवींद्र राऊत, प्रदीप चिनके, मिलिंद आढाव, निनाद दर्गे, समन्वयक राकेश पाखुर्डे, लहू दोलताडे, चांगदेव सानप, सरपंच मूठवली तर्फे तळे चे सौ.शर्मिला बडेकर, सरपंच ग्रामपंचायत सोनसडे सौ.माधुरी पारावे, पोलीस पाटील निवी मानसी बाबरे व गाव विकास समिती निवी व वावे हवेली, शेतकरी बांधव, ग्रामस्थ महिला व पुरुष उपस्थित होते.