|अलिबाग | वार्ताहर |
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन तडढऋ आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 अंतर्गत निवडलेली मुरूड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे या शाळेला गावातील पालकवर्ग व शिक्षकगण यांच्याकडून रुपये 37500/- किंमतीचा एक लॅपटॉप भेट म्हणून प्रदान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालकवर्ग व शिक्षकगण यांना अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती गुरव यांनीही शाळेला भेट दिली.
तसेच मार्गदर्शनपर लोकसहभाग, श्रमदान व पालकांची जबाबदारी समजवून सांगण्यात आली की, जेव्हा तडढऋ तर्फे रु.3 लाख शाळेला दिले जातात तर पालकांचेही शाळेप्रति काही कर्तव्य बनतात, शाळेकडे लक्ष देणे, यातूनच चक्रीवादळात शाळेचे झालेले नुकसान त्यामुळे शाळेला आवश्यक असलेली बाब होती म्हणजेच लॅपटॉप. आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनकडून शाळेला देण्यात आलेला लॅपटॉप हे अभियानाचे यशच म्हणता येईल, असे मत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन चे जिल्हा समन्वयक रत्नशेखर गजभिये यांनी व्यक्त केले.