| तळा । वार्ताहर ।
तळा शहराची ग्रामदेवता असलेल्या श्री चंडिका देवी पुनः दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार दि.5 व शुक्रवार दि.6 जानेवारी असे दोन दिवस हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी भाग घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.