। खेड । प्रतिनिधी ।
खेड येथील युवती पूनम जाधव यांना प्रथम श्रेणीत एल.एल. बी.परीक्षेत मुंबई विद्यापीठातून प्राविण्य मिळवले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सर्व थरातून होत आहे.त्यांचे आई वडील पिठाची गिरण चालवून आपला उदरनिर्वाह करीत असताना मुलांना चांगल्या प्रकारच शिक्षण देऊन त्यांनी वाढवलं आहे. त्यांचा भाऊ बी. टेक असून बहीण कळबनी हॉस्पिटल येथील कोव्हिड सेंटर येथे रुग्णाची सेवा उत्तम प्रकारे करीत आहे. या यशाचे श्रेय तीने आई वडील याना दिले. युवती सेनेचे काम करीत असताना त्यांच्या तळागाळातील तालुक्यातील जनतेशी दांडगा परिचय असून मी गरीब जनतेसाठी काम करीत राहीन असेही त्या म्हणाल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिभावान व्यक्तींचे सामर्थ्य सिद्ध होत असतं आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनतेची सेवा करत असताना अॅड. पूनम जाधव यानी आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.त्यांच्यावर तालुक्यातील जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.