। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होणार आहे, तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडणार आहेत.केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती जाहीर केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात 66 दिवसांमध्ये एकूण 27 बैठका होतील. सत्राची सुरुवात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सत्राद्वारे होईल. या दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचे हे पहिलेच संबोधन असणार आहे.