| आगरदांडा | कोर्लई | वार्ताहर |
मुरुडच्या वसंतराव नाईक कला वाणिज्य महाविद्यालय व कोकण मराठी साहित्य परिषद (युवाशक्ती) मुरुड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत प्रभावी वक्तृत्व व सूत्रसंचालन कार्यशाळा मुरुडमध्ये घेण्यात आली. यावेळी प्रा. मेहबूब नगरबावडी, हेमंत बारटक्के, संजय गुंजाळ, उप प्राचार्य विश्वास चव्हाण, वासंती उमरोटकर, प्रा.डॉ.एस.एस. बहिरगुंडे, सिद्धेश लखमदे, उषा खोत, अरुण बागडे, नैनिता कर्णिक, नयन कर्णिक, उर्मिला नामजोशी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डॉ.एस.एस. बहिरगुंडे केले. यावेळी संजय गुंजाळ , हेमंत बारटक्के यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचा लाभ तालुक्यातील 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. सूत्रसंचालन म्हात्रे सरांनी केले. आशिष पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुभाष म्हात्रे यांनी तर प्रा.डॉ. गायकवाड यांनी आभार मानले.