| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील असणार्या अष्टविनायक क्षेत्र महड येथील वरदविनायक मंदिरात माघी गणेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माघी गणेशोत्सव असल्याने अनेक भाविकांनी वरदविनायकाचे दर्शन घेतले. तसेच मंदिरात आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली असून तसेच मंदिर परिसर सजावट केली असल्याने भाविक देखील आकर्षित होत आहे.