राज्यस्तरीय ओपन कराटे स्पर्धेत पदकांची लयलूट
13 सुवर्ण, 19 रौप्य, 22 कांस्यपदकांची कमाई
| रसायनी | वार्ताहर |
सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगडच्या कराटेपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत पदकांची लयलूट केली. यामध्ये 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे. राज्यभरातून जवळपास तीनशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या खेळाडूंनी बजावलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांना मानाची द्वितीय क्रमांकाची चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील वाई, जोशिविहिर राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे शिनबूडो महाराष्ट्र स्टेट असोसिएशन तसेच ऑल इंडिया स्पोर्ट्स टीचर्स अँड प्लेयर्स फेडरेशनच्या माध्यमातून दी रॉयल चॅलेंज कप 2023 या नावाने राज्यस्तरीय कराटे ओपन चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपचे आयोजक सेंसाई सुशांत पोळ हे होते. राज्यभरातून निवडक जवळपास 300 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कराटेचे प्रशिक्षक मास्टर भूपेंद्र गायकवाड यांच्या सीकेटी महाविद्यालय शाखा, एस.एम.डी.एल. महाविद्यालय शाखा येथून 35 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याला फाइट (कुमिते) मध्ये सात सुवर्ण, दहा रौप्य व 14 कांस्यपदक मिळाली, तसेच परफोर्मिंग आर्ट (काता) मध्ये सहा सुवर्ण, नऊ रौप्य, आठ कांस्यपदक मिळवून दुसर्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली.
फाइट (कुमिते) :- सुवर्णपदक विजेते – आदित्य खंडिझोड, धनेशा शिंगोटे, अथर्व नांगरे, विश्वजीत बुरंगे, सार्थक माने, ओम कोठावले, साक्षी ननावरे.
रौप्यपदक – सोहम कोठावले, सूरज गायकवाड, मयूरी पिसे, वेदांत कुडके, समृद्धी तांगडे, स्वराली सगट, अद्विका खोडके, रिजुल कुंडलकर, आर्य ढवळे, योगिनी कुलकर्णी, ख्रिस्टिना कुंदर.
कांस्यपदक – शिवानी नांगरे, अथर्व ढमाळ, समरजीत पूकळे, मनस्वी पाटील, मीत पाटील, गोवर्धन पुजारी, भारती चव्हाण, यशराज चव्हाण, यश खुसपे, यथार्थ सोनावणे, पार्थ सुतार, व्योमा वाघमारे, अद्विका वाघमारे, अर्णव नींबरे.
परफोर्मिंग आर्ट (काता) :- सुवर्णपदक विजेते धनेशा शिंगोटे, शिवानी नांगरे, अथर्व ढमाळ, गोवर्धन पुजारी, साक्षी ननावरे, योगिनी कुलकर्णी.
रौप्यपदक – सार्थक माने, मीत पाटील, सोहम कोठावले, भारती चव्हाण, यशराज चव्हाण, यश खुसपे, समृद्धी तांगडे, अद्विका खोडके, रिजुल कुंडलकर. कांस्यपदक – अथर्व नांगरे, विश्वजीत बुरंगे, सूरज गायकवाड, मयूरी पिसे, वेदांत कुडके, स्वराली सगट, ख्रिस्टिना कुंदर, यश मोरे.