| खांब-रोहा | वार्ताहर |
रस्त्यावर काम करणार्या महिलांना हळदीकुंकवाचे वाण सामाजिक बांधिलकी जपून समाजासमोर एक वेगळा आदर्श जपण्याचे कार्य कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्था रोहा या संस्थेच्या वतीने रोहा शहर आणि परिसरात रस्त्यावर काम करणार्या महिला व बाहेरगावाहून आलेल्या महिलांसाठी खास हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या रस्त्यावर काम करणार्या महिला व बाहेरगावाहून आलेल्या महिलांशी संपर्क साधून कार्यक्रमाचे आयोजन करून हळदीकुंकवाचे वाण, भेटवस्तू व पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रियांका कांबळे व अन्य पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे समाजातून स्वागत होताना दिसत आहे.