पंडित पाटील यांचे कौतुकोद्गार
विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा झाला सन्मान
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीचा चांगली प्रसिद्धी आहे. या मॉर्निंग वॉक ग्रुप ग्रुपमुळे आरोग्याचे संवर्धन संवर्धन होते, असे कौतुगोद्गार माजी आमदार पंडित पाटील यांनी काढले. त्यांना यावेळी दक्ष मार्गदर्शक पुरस्काराने मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सन्मानित करण्यात आले. आंबेपूर-पेझारी येथील उपक्रमशील मॉर्निंग वॉक ग्रुपचा दहावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष (प्रभारी) प्रकाश धुमाळ, राजिपच्या माजी सदस्य भावना पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, उद्योजक सवाई पाटील, सरपंच सुमन पाटील, लिलाधर धुमाळ, राजाभाऊ हळदवणेकर, साहित्यिक-पत्रकार उमाजी केळुसकर, निलेश थोरे-पाटील, मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीचे अध्यक्ष प्रकाश नागू म्हात्रे, उपाध्यक्ष अनिल पाटील, कार्याध्यक्ष मोहन मंचुके व सचिव जी.सी. पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवपाल तिवारी यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते माजी आमदार पंडित पाटील यांचा दक्ष मार्गदर्शक सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. शिवपाल तिवारी यांनी आपल्या भाषणातून आरोग्य संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच चित्रलेखा पाटील यांनीही मार्निंग वॉक ग्रुपच्या आपण पाठीमागे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी चित्रलेखा पाटील यांना सावित्रीची लेक पुरस्कार, भावना पाटील यांना आंबेपूर भूषण पुरस्कार, सवाई पाटील यांना नवउद्योजक पुरस्कार, सुमन पाटील यांना आंबेपूर नवचैतन्य पुरस्कार, केळुसकर यांना पत्रकार भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर ज्ञान तपस्वी पुरस्काराने खेळुराम भोईर, हास्यविनोद पुरस्काराने पांडुरंग पाटील, सेवाभावी पुरस्कारने सुरेश पाटील, गुरुमाऊली पुरस्काराने अनिल पाटील, दिलखुलास पुरस्काराने राजाराम धुमाळ, शांतताप्रेमी पुरस्काराने कमळाकर पाटील, मनोरंजन गुणगौरव पुरस्काराने सहदेव पाटील, काव्यरंजन पुरस्काराने रामचंद्र म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.सी. यांनी, संस्थेच्या अध्यक्षांचे मनोगत प्रकाश म्हात्रे यांनी, सूत्रसंचालन रामचंद्र म्हात्रे यांनी तर आभार सुनील राऊत यांनी मानले.