| पनवेल । वार्ताहर ।
महानगर क्षेत्रातील खारघरमधील फुटपाथवर व्यवसाय करणार्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांचा वरदहस्त असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे आयुक्त गणेश देशमुख यांनी या विभागाची पाहणी करून या फेरीवाल्यावर जबर बसवावा, अशी मागणी गुरूनाथ पाटील यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महानगरपालिका क्षेत्र खारघर शहरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी मार्केट परिसरातील जागा उपलब्ध करून दिली असताना देखील खारघर शहरातील रस्त्याच्या बाजुला असलेल्या फुटपाथसारख्या मोक्याच्या जागी मोठया प्रमाणात फेरीवाले आपला व्यवसाय थाटून बसलेले दिसून येतात. वर्दळीच्या फेरीवाल्यांमार्फत फुटपाथ अडविल्यामुळे नागरीकांना प्रवास करताना देखील त्रासाचे होत आहे.
परप्रांतीय फेरीवाले रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत आपला धंदा करीत असताना देखील त्यांच्यावर मात्र महानगरपालिकेमार्फत कोणत्याही प्रकारची व कसलीही कारवाई कधीच केली जात नाही. कारण परप्रांतीय फेरीवाल्यांवर महापालिका कर्मचार्यांची मेहरबानी असून त्यांचा व्यवसाय राजरोसपणे चालू असतो. याआधी कार्यालयाकडे पत्र करून देखील सदरच्या फेरीवाल्यांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी आपण आपल्या स्तरावर योग्य पहाणी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी गुरुनाथ पाटील यांनी केली आहे.