| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अंगणवाडी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांचा केंद्र शासन व संसदेत पाठपुरावा करण्यासाठी खा.सुनील तटकरे यांना अंगणवाडी कर्मचारी सेविकांनी निवेदन दिले. मानधनात भरीव वाढ, उत्तम प्रतीचा मोबाईल, मिनी अंगणवाडी सेविकांना थेट नियुक्ती करावी व अन्य सोई सवलती सेवा सुविधा मिळाव्यात या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी खा सुनिल तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना जलद न्याय देण्याच्या दृष्टीने संसदेत योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वाशीत केले. यावेळी अंगणवाडी सेविका मनिषा नांदगावकर,स्वाती घोसालकर, मीनल घोसालकर, मानसी पवार, ललिता पाटिल, मयूरी सावंत, कीर्ती वाघमारे, तृप्ती केणी, प्रमोदिनी शिवलकर, अविष्का वरसोलकर, लता वरसोलकर, सुवर्णा पारसकर, गीतांजली वरसोलकर, दर्शना शिवलकर आदि उपस्थीत होते.