नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटरकडून कारवाई करण्यात आली. ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं तात्पुरतं लॉक केलं होतं. राहुल गांधी यांनी ट्विटरला दिल्लीमधील नऊ वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा फोटो हटवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठवत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद करण्यात आलं असून ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती काँग्रेसकडून ट्वीट करत देण्यात आली. तोपर्यंत राहुल गांधी इतर माध्यमातून तुमच्या संपर्कात राहतील आणि लोकांसाठी आपला आवाज उठवत राहतील असंही काँग्रेसने म्हटलं आहे.