| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील वावंजे येथील एका गाळयात ठेवलेल्या एक लाख एकवीस हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. वावंजे येथील एस मेक इंजीनियरिंग वर्क्स, गाळा नंबर ई, आठ- नऊ, वावंजे येथील गाळ्यात ठेवलेला एक लाख 21 हजार रुपयांचे लाल रंगाच्या लोखंडी रिंग गार्डरचे साडेनऊ फुटाचे वीस तुकडे चोरट्याने गाळ्याच्या लोखंडी गेटला लावलेले कुलूप तोडून चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
सैजाद उर्फ बटला इस्माईल शेख ( वावंजे गाव) आणि सगीर अब्दुल अजिज शेख ( वावंजेगाव) हे दोघे दोन टेम्पोमध्ये मालभरून कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्सच्या मागे असल्याची माहिती या पथकाला मिळताच त्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना 2 टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.