• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

स्त्री शिक्षणाचे प्रणेते – महात्मा फुले

Varsha Mehata by Varsha Mehata
April 10, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रणविरसिंह राजपूत

पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत शतकानुशतके अज्ञानाच्या अंध:कारात पशुसमान जीवन जगणार्‍या स्त्रियांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं महान कार्य महात्मा जोतिबा फुले अन् सावित्रीबाई फुले यांनी केलं,ही अद्वितीय अन् अतुलनीय गोष्ट आहे.स्त्री शिक्षणाचे प्रणेते जोेतिबा फुलेंना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली! 

जोतिबांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील ‘कटगुण’ या गावी झाला.त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर,वडिलांचे गोविंदराव फुले.क्रांतीसुर्य जोेतिबा फुले यांनी शिक्षणातून समाज प्रबोधन व जातीभेद निर्मूलन चळवळ राबवून गुलामगिरी, छूत-अछुत,वर्णभेद  सारख्या समाजविघातक जातीव्यवस्थेतील  अपप्रवृत्तींचा नायनाट केला अन् त्याजागी सामाजिक समता,धार्मिक सहिष्णुता व आर्थिक न्याय प्रस्थापित केला.‘सर्वात महत्वाचे म्हणजे  जोेतिबांनी रायगड किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे जीर्णोद्धार केले.रयतेचे राजा शिव छत्रपतींप्रती ज्योतिबांना नितांत आदर होता. तत्कालिन समाजातील पददलित,शेतकरी,कामगार व विधवा परित्यक्त्या महिला या घटकांना न्याय मिळावा,यासाठी फुलेंनी प्रखर लढा देऊन सामाजिक क्रांती घडवून आणली.तळागाळातील लोकांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव निर्माण व्हावी,या उद्देशाने त्यांनी ‘गुलामगिरी’ ही कादंबरी लिहिली.
‘निरक्षरता’ हे गुलामगिरीचं मुळ कारण असल्याने त्यांनी मागासवर्गीयांसाठी विविध ठिकाणी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.माणूस हा जन्माने वा जातीने नव्हे तर, आपल्या कर्तुत्वाने श्रेष्ठ-कनिष्ठ ठरत असतो,हा विचार त्यांनी रयतेला दिला.सामाजिक व आर्थिक विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेला झुकारून समतेवर आधारित नवसमाजाची निर्मिती करण्यासाठी फुलेंनी ‘सत्यशोधक समाज’ ची स्थापना केली. गरीब,निर्धन मुलींचे विवाह कमी खर्चात संपन्न व्हावेत,यासाठी फुलेंनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरू केली.त्यामुळे हुंडा घेऊन लग्न करण्याच्या अमानवीय पद्धतीवर गदा आली.विधवा मुलींच्या केशवपन पद्धतीविरुद्ध लढा पुकारून त्यांनी ती पद्धती बंद करण्यास भाग पाडले.
इतकेच नव्हे तर,अज्ञानाच्या अंधारात बंदिस्त स्त्रियांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेंच्या वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेची मुहूर्तमेढ करून स्त्री शिक्षणाचे नवं पर्व सुरू केलं.ह्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून जोतिबांनी सावित्रीबाई फुले यांची नियुक्ती केली.ही शाळा पारतंत्र्याच्या काळातील पहिली मुलींची शाळा गणली गेली अन् सावित्रीबाई ह्या देशातील पहिल्या शिक्षिका म्हटल्या गेल्या.फुलेंना स्त्रियां विषयी नितांत आदर व आपुलकी होती.जोेतिबा म्हणत,स्त्रियांना ‘चूल अन् मुल’ या चौकटीत बंदिस्त करायला नको.कारण एक स्त्री शिकली तर,एक कुटुंब शिक्षित होते. पण सार्‍या स्त्रिया शिकल्या तर,संपूर्ण देश जागृत होतो.
बारा वर्षाखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे,ही त्यांची मागणी होती.त्यांनी ‘हंटर कमिशन’ पुढे आपली कैफियत मांडताना त्यांनी आपल्या आवेशपूर्ण वक्तव्यात म्हटलं की,केवळ उच्चवर्णियांसाठीच शैक्षणिक धोरण न मांडता,समानतेच्या आधारावर तळागाळातील लोकांच्या पाल्यांसाठीही शिक्षणाची सोय व्हावी.त्यांच्या मतानुसार समाजातील गरजू उपेक्षित घटकांना शिक्षण दिलं तर,सामाजिक गुलामगिरी संपुष्टात येऊन आर्थिक संपन्नता येईल.महत्वाचे म्हणजे मागासवर्गीयांमध्ये आपल्या मानवी हक्कांची जाणीव निर्माण होईल.जोतिबा हे सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते,हे दृष्टोत्पत्तीस येते.
जोेतिबा म्हणत,‘विद्येविना मती गेली,मतीविना निती गेली,नीतिविना गती गेली,गतिविना वित्त गेले,इतके अनर्थ अविद्येने केले’. स्त्रियांना शिक्षण मिळावे अन् तत्कालिन समाजातील निरक्षरता व गुलामगिरीचं उच्चाटन व्हावं,यासाठी फुले दांपत्याने सारं आयुष्य पणाला लावलं.आपल्या शाळेकडे प्रस्थान करताना,त्यांना कर्मकांडी समाजाच्या छळाला सामोरे जावे लागायचे.अर्वाच्य शब्दात टोमणे मारणे,अंगावर शेणचिखल फेकणे आदी अमानुष कृत्ये केली जायायची.इतकेच नव्हे तर, ऐकेप्रसंगी तर डोक्यावर दगड लागून सावित्रीबाई अक्षरशः रक्तबंबाळ झाल्या होत्या.तथापि  संयमशील राहून फुले दांपत्याने तसूभरही विचलित न होता,आपली ध्येयपूर्ती करण्यासाठी वाटचाल सुरूच ठेवली.त्याचं फलित म्हणजे आज सावित्रीच्या लेकी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात आघाडी घेताना दिसताहेत,ही फुले दाम्पत्याचीच पुण्याई म्हणावी.यास्तव त्यांना त्रिवार मानाचा मुजरा!
सावित्रीबाईंनी अनाथ मुले-मुली,विधवा,परिव्यक्त्या महिलांना आपल्या दारी आश्रय दिला.स्त्री शिक्षणाची मोहीम राबविण्याआधी फुलेंनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केलं. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती राष्ट्राला उद्धारी’ या शब्दात फुलेंनी रयतेला स्त्री महात्म्य विषद केलं.सन 1877 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत फुले दांपत्याने गावोगावी फिरून निधी जमवला.याशिवाय धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम उभारून तेथे सुमारे एक हजार अनाथ-निराधार लहान मुलांची भोजन व्यवस्था केली.प्रतिबंधक गृहातील मुलांना  सावित्रीबाईंनी मायेची ऊब देत त्यांना आपलेसे केले.पुण्यात प्लेगची साथ पसरली असता,त्याकडे इंग्रज सरकारने वैद्यकीय साधनसामग्री देण्यास अक्षम्य दुर्लक्ष केलं.त्याचा फुले दांपत्याने जाहीर धिक्कार केला.तथापि,आपला दत्तक पुत्र डॉ.यशवंतराव यांनी  प्लेगग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत.अखेर या लढ्यात त्यांचा अन् सावित्रीबाईंचा प्लेगची लागण होऊन दुःखद निधन झाले.अशाप्रकारे त्यांनी लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.त्यांच्या महान बलिदानाला आम्ही त्रिवार वंदन करतो.वास्तवात फुले दाम्पत्य हे मानवतावादी धर्माचं मूर्तिमंत प्रतिक होत,हे सिद्धीस येते.
जोतिबांना शेतकरी वर्गाविषयी मोठी कणव होती.शेतकर्‍यांचा आर्थिक विकास अन् त्यांच्या पाल्यांना सक्तीचे शिक्षण हा जोेतिबांच्या समाज प्रबोधनाचा एक प्रमुख भाग होता.शेतकर्‍यांना कृषी उत्पादनविषयी उपयुक्त मार्गदर्शन मिळावे,या उद्देशाने त्यांनी ‘आसूड’ हे पुस्तक लिहिले.जोतिबांनी इंग्रज सरकारला डेक्कन ग्रिक्लचर्स रिलीफ क्ट संमत करण्यास भाग पाडले.शेतकर्‍यांचे प्रश्‍न मानवतावादी दृष्टिकोनातून इंग्रज सरकारने मार्गी लावावेत,यासाठी त्यांनी प्रखर लढा दिला.या पार्श्‍वभूमीवरच फुलेंना ‘शेतकर्‍यांचे कैवारी’ म्हटले जायचे.जोतिबा हे कामगारांच्या प्रश्‍नाबाबतदेखील जागृत होते.‘मार्क्सच्या तत्त्वज्ञानातील वर्गयुद्ध’ हे ऐतिहासिक सत्य आहे,असे फुलेंचे ठाम मत होते.आर्थिक शोषण अन् बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी फुलेंनी कामगार लढा उभारला.कामगारांना आर्थिक विकास करण्यासाठी उन्नतीचा मार्ग दाखविला.यामुळेच जोतिबांना ‘कामगारांचा मसिहा’ म्हणतात.
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले अन् स्त्री शिक्षणाच्या प्रवर्तक सावित्रीबाई फुले यांनी हातात हात घालून तत्कालिन रुढीप्रिय समाजातल्या जातीभेद,वर्णभेद,केशवपन, बालविवाह या कुप्रथांना कडाडून विरोध केला तर,विधवा पुनर्विवाहास पाठिंबा दिला.जोेतिबा म्हणतात,‘सार्वभौम सत्य स्वतः आचरावे,सुखे वागावे पंगू लोका,अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल अन् स्वतः सुखी व्हाल,ज्योती म्हणे!’
आपल्या उजव्या हाताला अर्धांगवायू झाला असता,त्यांनी डाव्या हाताने लिहून आपला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ पूर्ण करून नवसमाजाला समर्पित केला.यावरून हे सिद्ध होते की,त्यांना समाजप्रबोधनाची किती तळमळ होती.सामाजिक समतेचा अखंड लढा देत असताना दुर्दैवाने 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचं अर्धांगवायूच्या झटक्याने दुःखद निधन झालं.आज जोतिबा जरी आपल्यात नसले तरी,त्यांचे समतेचे विचार आजही आमच्या मनात जिवंत आहेत.त्यांना आमचा दंडवत प्रणाम!
 महाराष्ट्राला ‘शाहू -फुले -आंबेडकर’ यांचा समृद्ध सामाजिक वारसा लाभला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.जोेतिबा फुले यांच्या पावलावर पाऊल टाकत,राज्य सरकारने 12 वर्षाखालील मुला-मुलींना मोफत सक्तीचं प्राथमिक शिक्षण जाहीर केलं.यापूर्वी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि साताराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपापल्या संस्थानांत फुलेंचा प्राथमिक शिक्षणाचा नियम लागू केला.त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही राज्यघटनेच्या 45 व्या कलमात मुला-मुलींच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारवर टाकली.खरं तर,महाराष्ट्र सरकार हे जोतिबा फुले यांचे पाईक आहे.
‘मित्रहो,ज्या पुण्यातील भिडेंच्या वाड्यात फुले दांपत्याने भारतातील पहिली मुलींची शाळा काढली होती’,शैक्षणिक संस्था आणि मागास जातींच्या मुला-मुलींसाठी राज्य शासनाकडून वसतिगृहे चालविले जात आहेत.जेणेकरून तळागाळातील लोकांच्या पाल्यांना शिक्षणासह विविध शिष्यवृत्तींची सोय होऊ शकेल.राज्यातील गोरगरीब,गरजू लोकांना आपल्या महागड्या ऑपरेशन्ससाठी वैद्यकीय अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे,यासाठी राज्य सरकारने ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबविली. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींच्या उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी नाममात्र व्याज दरात अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने ‘महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन केलं.सांगण्याचं तात्पर्य म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संकल्पनेतील पुरोगामी महाराष्ट्राची उभारणी करणं,म्हणजेच त्यांना खरी आदरांजली ठरेल
‘सदस्य,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोंकण विभाग’ (मो.न.9920674219)

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

बस्स झाले देवदर्शन

Next Post

#शेकाप रोजगार मेळावा! मुरुडमध्ये नोंदणीला सुरुवात

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
#शेकाप रोजगार मेळावा! मुरुडमध्ये नोंदणीला सुरुवात

#शेकाप रोजगार मेळावा! मुरुडमध्ये नोंदणीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?