। पनवेल । वार्ताहर ।
गृहनिर्माण सोसायटीमध्ये पुनर्विकास प्रकल्पास सामोरे जावे लागणार्या विविध प्रकारच्या समस्यांची माहिती व्हावी. तसेच विकासकाकडून असलेले धोके किंवा अर्धवट प्रकल्प सोडून गेल्यावर करण्यात येणारी कारवाई या विषयात गृहर्निर्माण सोसायटींना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता सहकार भारती च्या वतीने रविवार 16 एप्रिल रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पास सुरुवात करताना सामोरे जावे लागणार्या विविध समस्या तसेच विविध प्रकारचे धोक्याला देखील सामोरे जावे लागते. विकासकाकडून असलेले धोके किंवा विकासक अपूर्ण प्रकल्प सोडून जाणे अशा विविध घटना घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर या विषयात व गृहर्निर्माण सोसायटींना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने रविवार 16 एप्रिल रोजी गोखले सभागृहात दुपारी 3.30 वाजता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अॅड. राहुल पाटील, दिवेकर चव्हाण हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि मेंबर्स यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनिषा म्हात्रे निमसे यांनी केले आहे.