दोघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील एका महिलेचे आपल्या पतीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत दोन जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
9 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9:00 वा सुमारास फिर्यादी बाबूची चाळ, शास्त्रीनगर येथील आपल्या घराबाहेर बसले असता आरोपी पतीपत्नी यांनी त्यांच्या घराबाहेर उभे राहून फिर्यादीच्या आईला शिवीगाळी व धमकी देली. तसेच जखमी साक्षीदार घराबाहेर आले असता, पतीने हाताने तोंडावर फाईट मारून जखमी करून त्यांच्या पत्नीने फिर्यादीच्या आईचे केस पकडून त्यांना काठीने, हाताबुक्याने मारहाण केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक आर. बी. निगडे हे करीत आहेत.