। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र दिना निमित्त पीएनपी एज्युकेशन सोसायटी वेश्वी संकुल येथे पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, बी. एड. कॉलेजचे प्राचार्य नितेश मोरे, पीएनपी महाविद्यालयाचे डायरेक्टर विक्रांत वार्डे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रविंद्र पाटील, होली चाईल्ड स्कुलच्या मुख्याध्यापिका व्ही. वेणी, मुख्याध्यापिका निशिगंधा मयेकर, मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, इंग्रजी माध्यमाच्या कोओर्डीनेटर श्रुती सुतार, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.